Distribution of Certificates

 मायको एम्लॉईज फोरम आणि  बॉश सी.एस, आर, नाशिक यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट या आदिवासी भागात  गत 6 महिन्यापासून किशोरी मंच, कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, टेलरींग प्रशिक्षन केंद्र, इ . कोर्स चालू होते. दि. 8/4/22 रोजी फोरमचे कार्यकर्ते यांनी चंद्राची मेट या गावी भेट दिली. या प्रसंगी BOSCH CSR च्या जनरल मॅनेजर साकीरा बकेर मॅडम व राहुल आहेर ,जंगम मॅडम MS CIT चे प्रशिक्षक सोनवणे सर आणि चंद्राची मेट गावचे सरपंच, ग्रामस्थ ,महिला व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. या प्रसंगी साकीरा मॅडम यांनी CSR अंतर्गत फोरमच्या माध्यमातून खूपच उल्लेखनीय कार्य होत आहे असे प्रतिपादन केले. यापुढेही फोरम च्या माध्यमातून असेच कार्य होत राहील असे विचार त्यानी  व्यक्त केले. या प्रसंगी  कम्प्युटर कोर्स पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  या प्रसंगी  फोरमचे उपाध्यक्ष-श्री सोनवणे काका ,सचिव-श्री संजय कुऱ्हे, स.सचिव-श्री पटेल काका,विश्वस्त-श्री हेमंत सूर्यवंशी, श्री सुधीर गोसावी,श्री महेश शिरसाठ, व्यस्थापक-श्री. विलास नलावडे व तुळजाई महिला बचत गट अध्यक्षा सौ. हेमा कुऱ्हे व MS CIT चे प्रशिक्षक श्री. सोनवणे  हे या  प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमास  BOSCH CSR चे कर्मचारी,  चंद्राची मेट सरपंच  ,ग्रामस्थ मोठ्या संखेने  उपस्थित होते.