Career Guidance
मायको एम्प्लॉईज फोरम व बॉस सी. एस. आर. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 03 मार्च 2022 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भिलमाळ व सामुंडी या आदिवासी भागातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करिअरच्या दिशा या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मानसशास्त्राचे अभ्यासक व सभानायक माननीय किरण मोहिते यांनी मार्गदर्शन केले.